आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:समृद्धी महामार्ग ही देवेंद्र फडणवीस यांची देणगी

सिंदखेडराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ व मराठवाड्यासाठी समृद्धी महामार्ग ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देणगी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथून हिंगोलीला जात असताना किनगावराजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांच्या निवासस्थानी डॉ. कराड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.डॉ. कराड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरून शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग होता. हा महामार्ग २० जिल्ह्यांमधून जातो. समृद्धी महामार्गामुळे परिसराचा विकास होणार आहे. महामार्ग सुरू होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई किंवा नागपूरला जाण्यासाठी नागरिकांना चांगला महामार्ग मिळाला आहे. दळणवळणाची चांगली सुविधा झाली आहे.

त्यामुळे व्यापार वाढणार आहे. नागरिकांच्या जीवनात समृद्धी येण्यास सुरुवात होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. शिवानंद जायभाये, नंदकिशोर मांटे, शिवाजीराव काळुसे, सुभाषराव घिके, खुशालराव नागरे, डॉ. ज्ञानेश्वर पातुरकर, दीपक पडुळकर, भरत जायभाये आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...