आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:टाळ-मृदंगाच्या गजरात साफसफाई करत संग्रामपूरवासीयांची शेगावचे व्रतस्थ सेवेकरी शिवशंकरभाऊंना अनोखी श्रद्धांजली

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी होत गावकऱ्यांनी केली गावाची स्वच्छता

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानची जगभर ओळख आहे ती तेथील स्वच्छता आणि सेवाव्रतींमध्ये असलेल्या शिस्तीमुळे. समर्पित भावनेने येथे प्रत्येक जण सेवा देतो. येथील नीटनेटके व्यवस्थापन हा नेहमीच मनाला भावणारा आणि चर्चेत राहणारा विषय ठरला. ही सारी किमया साध्य झाली ती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त व निष्काम कर्मयोगी स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांच्यामुळे. ४ ऑगस्टला त्यांचे निधन झाले आणि विदर्भासह देश-विदेशातील श्री गजानन महाराजांच्या भक्तांवर शोककळा पसरली. या महात्म्याला संग्रामपूरमध्ये (जि. बुलडाणा) रविवारी अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्या शिस्तीसाठी आणि स्वच्छतेसाठी शिवशंकरभाऊ ओळखले जात त्या स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात स्वच्छता दिंडी काढत रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबवली.

राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सुरुवातीपासूनच स्वच्छतेकडे पुरेपूर लक्ष दिले जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वप्रथम शेगावच्या या मंदिराचे नाव घेतले जाते. संग्रामपूर शहरात रविवारी सकाळी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी वारकऱ्यांनी शहरातील मंदिर, बसस्थानक व जामा मशीद परिसरात स्वच्छता करत संदेश दिला. या मोहिमेत गावातील महिला-पुरुषांसह असंख्य गावकरी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...