आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा जीभ घसरली:फडणवीसांच्या तोंडात कोरोना जंतू कोंबण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना आमदाराचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ, भाजप नेत्यासाठी वापरली शिवराळ भाषा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी एक लोकप्रतिनिधी असताना भाषेची मर्यादा सोडली - Divya Marathi
नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी एक लोकप्रतिनिधी असताना भाषेची मर्यादा सोडली

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी एक लोकप्रतिनिधी असताना भाषेची मर्यादा सोडली. तसेच एका भाजप नेत्याच्या विरोधात चक्क शिवराळ भाषा वापरली. कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ऑक्सिजन, लस आणि इंजेक्शनवरून वाद पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी रविवारी एक व्हिडिओ जारी करून फडणवीसांविषयी असभ्य भाषा वापरली होती.

नवीन व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी भाजप नेते संजय कुटे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुटे यांच्यावर बोलताना गायकवाड यांनी भाषेची मर्यादा ओलांडली. तसेच शिवराळ भाषेत कुटे यांच्यावर एकानंतर एक टीका केली. फडणवीसांवर टीका केल्यानंतर संजय कुटे यांनी गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच मवाली म्हटले होते. त्यावर गायकवाड संतापले आणि संजय कुटे हा तीन पट दारू पिऊन पडलेला असतो यासह शिवराळ भाषा वापरली.

विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या तोंडात कोरोना जंतू कोंबण्याची भाषा केल्यानंतर गायकवाड यांच्यावर चौफेर टीका झाली. तरीही त्यांना पक्षाकडून समज देण्यात आला नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी एक व्हिडिओ जारी करून गायकवाड यांनी नवा वाद निर्माण केला.

फडणवीसांना काय म्हणाले होते गायकवाड
कोरोनावरुन सुरू असलेल्या राजकाणावरुन बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ते म्हणाले की, 'सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण, विरोधीपक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाले, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन,' असे संजय गायकवाड म्हणाले. तसेच, यावेळी गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचा एकेरी भाषेतही उल्लेख केला.

संजय गायकवाड पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार राज्यसरकारला मदत कराण्याऐवजी बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत करत आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत दिले. जर माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार...? तुम्ही सरकार पाडायला निघालात, पण आधी माणसे जिवंत ठेवा, मग राजकारण करा, असे गायकवाड म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...