आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी दिंडी:संत भोजने महाराज पायी दिंडीचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान ; श्री क्षेत्र अटाळी येथून निघणार दिंडी

खामगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल रुख्माई सद्गुरु भोजने महाराज संस्थानची पायदळ दिंडी तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी येथून उद्या १९ जून रोजी सकाळी आठ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

आमदार ॲड. आकाश फुंडकर अध्यक्ष असलेले तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी येथून आषाढी एकादशी निमित्त मागील पंधरा वर्षापासून पंढरपूर कडे पायदळ वारी दिंडी जात असते. या दिंडीत अटाळीसह पंचक्रोशीतील वारकरी विठ्ठलाचा जयघोष करीत पंढरपूरला जातात. ही दिंडी उद्या रविवार १९ जून रोजी सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र विठ्ठल रुख्माई सद्गुरु भोजने महाराज संस्थान येथून प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी श्री संत भोजने महाराज पालखीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ देखील या दिंडीत सहभागी होणार आहे. ही दिंडी देऊळगाव साकर्शा, जानेफळ, मेहकर, लोणार, तळेगांव, गेवराई, साटोणा, आष्टी, सादोळा, पथ्रुड, कळंब, येरमाळा,जामगाव, खांडवी, भोसारे, या मार्गे पंढरपूर येथे ७ जुलै रोजी पोहोचणार आहे. या दिंडीत शेकडो पायदळ वारी करणारे वारकरी सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...