आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य खाक:शॉर्ट सर्किटमुळे साडी सेंटरला आग; साहित्य खाक ; लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

खामगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्युत मीटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन मेन रोडवरील मधुबन साडी सेंटरला आग लागल्याची घटना ९ जूनला रात्री घडली. यात दुकानातील साड्या, कपडे व साहित्य जळून जवळपास सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकान मालक राजेंद्र मोहता रा.अनिकट रोड हे नेहमीप्रमाणे ९ जूनला रात्री दुकान बंद करून घरी गेले. मात्र रात्री १० वाजे दरम्यान दुकानातील विद्युत मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक दुकानाला आग लागली. ही बाब कळताच परिसरातील नागरिकांनी मेन रोडवर गर्दी केली. याबाबत माहिती देऊन तत्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. न. प. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवले.

बातम्या आणखी आहेत...