आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली तालुक्यातील मेरा, असोला, अंत्री खेडेकर, गुंजाळा, अंचरवाडी या परिसरात वन्यप्राणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. या परिसरातील शेतकरी पिके वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचे दिसून येत आहे.
त्यातच या भागातील अनेक शेतकऱ्यांनी नवी शक्कल लढवत वन्य प्राण्यांचा हैदोस रोखण्यासाठी शेताभोवती धुऱ्यांव साड्यांचे कुंपण उभे केले आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांना धोका असतानाच परिसरात वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळेही पिके संकटात सापडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रात्रीची झोपही उडाली आहे.
पिकांच्या आधारावरच शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने शेतकरी मुला-बाळांप्रमाणे पिकांना जीव लावतात. परंतु, वन्य प्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जात नाही. तसेच वन विभागही याची दखल घेत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. पिके वाचविण्यासाठी वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही परिसरातील शेतकरी करत आहेत. पिकांची वन्य प्राण्यांकडून होणारी नासाडी थांबविण्यासाठी परिसरातील शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
शेतकरी पिकांसाठी विविध पर्याय शोधत आहेत. त्यामध्ये शेतांभोवती अनेकांनी तारेचे कुंपण केले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तर वेगळाच पर्याय शोधत साड्यांचेही कुंपणही केल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण शेताभाेवती साड्यांचे कुंपण तयार केल्याने वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी कमी प्रमाणात होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
परिसर झाला विविधरंगी
परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेताभोवती विविधरंगी साड्यांचे कुंपण केले आहे. त्यामुळे सर्वदूर पसरलेल्या पिकांच्या हिरवळीसोबतच कुंपणाच्या साड्यांमुळे परिसर रंगीबेरंगी दिसून येत आहे.
शेतांना फायदा
वन्य प्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी बाजारातून आणलेल्या तसेच घरात असलेल्या जुन्या साड्या िकंवा कापड कुंपणाला लावतो. यामुळे शेतांना थोडा का होईना फायदा होतो. - खंडू लोखंडे, शेतकरी, असोला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.