आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई‎ फुले जयंती उत्साहात‎

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव येथील युगधर्म पब्लिक स्कूल मध्ये आज‎ ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती‎ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्या व‎ शिक्षक वर्ग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून‎ सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करण्यात‎ आले.

वर्ग आठवीचा विद्यार्थी मेहेर शेटे यांनी‎ प्रास्ताविकातून सावित्रीबाई बद्दल माहिती दिली.‎ कार्यक्रमाचे संचालन वर्ग सहावीचे विद्यार्थी हर्षित‎ वानखेडे व हेमल बोहरा यांनी केले. कार्यक्रमाला‎ प्राचार्य, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित‎ होते. उपस्थितांचे आभार हर्षित वानखडे मानले.‎ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.‎ सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना शिक्षकवृंद.‎

बातम्या आणखी आहेत...