आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. शिक्षित समाज घडवण्याचे त्यांचे कार्य मोठे असून सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आज महिलांना समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज ३ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्य प्रशासक जालिंधर बुधवत व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. त्या प्रतिभाशाली कवयित्री, प्रभावशाली शिक्षिका, निःस्वार्थी व धडाडीच्या समाजसेविका, स्त्री-पुरुष समानतेच्या प्रणेत्या होत्या. त्यांनी स्रियांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिल्याचे जालिंधर बुधवत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, गौतम बेगाणी, संजय दर्डा, नितीन मानमोडे, पाचरणे अण्णा, किशोरहिवाळे, भागवत गायकवाड, रमेश गुंजकर, संतोष शिंदे, सुनील गवळी, संदीप आराख, शंकर बांडे, अरुण पंडितकर, राहुल चव्हाण, योगेश चव्हाण, मनीष बनसोड, सचिव वनिता साबळे, दीपक चव्हाण, बबन निकम, सुनील काळवाघे, शशांक जेऊघाले, गजानन व्यवहारे, सतीश शेळके, अनिल देवकर, वर्षा भोंडे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थिती होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.