आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद ‎:सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा जागर‎ कौतुकास्पद ‎: राजे विजयसिंह जाधव‎

देऊळगावराजा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले‎ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित‎ वक्तृत्व स्पर्धेत त्यांच्या विचारांचा‎ जागर होणे ही कौतुकास्पद बाब आहे,‎ असे प्रतिपादन श्री बालाजी संस्थानचे‎ वंशपारंपरिक विश्वस्त तथा श्री‎ व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष‎ राजे विजयसिंह जाधव यांनी केले.‎ माऊली बहुउद्देशीय सेवाभावी‎ संस्थेच्या वतीने श्री व्यंकटेश‎ महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व‎ स्पर्धेच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत‎ होते. अध्यक्षस्थानी इंग्रजी‎ विभागप्रमुख डॉ. सुधीर चव्हाण होते.‎ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी‎ पंढरीनाथ म्हस्के यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात‎ श्री बालाजी महाराज आणि‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा‎ पूजनाने झाली. पुढे बोलताना राजे‎ विजयसिंह जाधव यांनी प्रत्येक‎ व्यक्ती त्याच्यातील विशिष्ट‎ कलागुणामुळे परिचित असतो, असे‎ सागितले. वक्तृत्व हा गुणही अत्यंत‎ महत्त्वाचा असून, स्पर्धेच्या‎ माध्यमातून तो विद्यार्थ्यांमध्ये‎ विकसित होईल, अशी अपेक्षा त्यांनी‎ व्यक्त केली.

डॉ. सुधीर चव्हाण यांनी‎ विद्यार्थिदशेत आपल्याला जे काही‎ शिकायला मिळेल ते आपण अवगत‎ करावे, असे मत व्यक्त केले.‎ प्राथमिक, माध्यमिक, उच्च‎ माध्यमिक व महाविद्यालयीन गटात‎ आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत विविध‎ शाळा, महाविद्यालयांतील‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक‎ म्हणून श्री व्यंकटेश‎ महाविद्यालयातील सांस्कृतिक‎ विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव,‎ देऊळगावराजा कनिष्ठ‎ महाविद्यालयाचे डॉ. किरण जायभाये‎ व अर्जुन आंधळे यांनी काम पािहले.‎ सूत्रसंचालन सुनंदा कुहिरे हिने केले.‎ माऊली बहुउद्देशीय सेवाभावी‎ संस्थेच्या अध्यक्षा वैशाली तिडके‎ यांनी प्रास्ताविक केले. तर मेघा‎ निकम यांनी आभार मानले. वक्तृत्व‎ स्पर्धेचे सूत्रसंचालन भागवत म्हस्के‎ यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...