आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाता सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरु करुन, स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. त्यांचे हे कार्य म्हणजे स्त्रीच्या शिक्षणासाठी अभूतपूर्व असे कार्य आहे. असे प्रतिपादन प्रा. सुधाकर हिवाळे यांनी केले. भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, व समस्त स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाच्या वतीने १० मार्च रोजी मंडळाच्या सभागृहात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष के. टी. पांडव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष प्रभाकर चंद्रभान घोंगडे व राजश्री जगन्नाथ उबाळे या उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी प्रभाकर चंद्रभान घोंगडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर के. टी. पांडव यांनी सावित्रीमाई फुले यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष गजानन हुडेकर यांनी केले. कार्यक्रमाला काशीराम लहासे, तुकाराम पांडव, रामराव हुडेकर, आनंदा सोनुने, विठ्ठलराव सोनुने, डॉ. नंदकिशोर पवार, प्रकाश लहासे, रामेश्वर हुडेकर, जगन्नाथ उबाळे, पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव रमेश हुडेकर यांनी तर आभार अंबादास लक्ष्मण गोरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.