आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजनेसह शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करावे लागतात. असे परिपूर्ण अर्जच महाविद्यालयीन स्तरावरुन येत नसल्यामुळे प्रथम वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सर्वच प्रवर्गाचे अर्जांची संख्या फक्त २२ हजार ७७१ इतकीच आल्याने उर्वरीत अर्जाबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालयांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनुसूचित जातीचे ३१४२ अर्ज सध्या महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालक फी भरावी लागण्याच्या शक्यतने चिंतीत आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी २१ सप्टेंबर २०२२ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागतात. परंतु अजूनही महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण स्तरावर पोहोचलेले नाहीत. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १० पर्यंत दिली मुदत मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षण घेता यावे तसेच भोजन, निवास, शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अर्जासाठी मात्र १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प आहे. अनुसूचित जातीच्या कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १० पर्यंत दिली मुदत मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षण घेता यावे तसेच भोजन, निवास, शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अर्जासाठी मात्र १० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महाविद्यालयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह अनुसूचित जातीचे ४८६५ अर्जच मंजूर व्यावसायिक महाविद्यालय ९८, बिगर व्यावसायिक महाविद्यालय ६८, अकरावी व बारावी १९० कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाची अर्जाची संख्या एकूण ९ हजार ८० व इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे २२ हजार ७७१ आहेत. अनुसूचित जातीच्या प्राप्त अर्जांची संख्या ८५१८ इतकी आहेत. महाविद्यालयीन स्तरावर ३१४२ अर्ज प्रलंबित आहेत. समाज कल्याण विभागाने ४८६५ अर्ज मंजूर केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.