आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित शाळेत प्रवेश‎ अर्ज सादर:अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना‎ नामांकीत शाळेत प्रवेशाची संधी‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकात्मिक आदिवासी विकास‎ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अकोला,‎ वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील‎ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना‎ शहरातील इंग्रजी माध्यमांच्या‎ नामांकीत निवासी शाळेमध्ये‎ पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येणार‎ आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी‎ अकोला येथील प्रकल्प अधिकारी‎ यांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज‎ सादर करावा, असे आवाहन‎ करण्यात आले आहे.‎ इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी‎ प्रत्यक्ष संपर्क साधून, तसेच‎ नजीकच्या शासकीय किंवा‎ अनुदानित आश्रमशाळेत प्रवेश‎ अर्ज सादर करावा.

विद्यार्थी इतर‎ कोणत्याही शाळेत प्रवेशित नसावा,‎ प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम‎ मुदत दि. ८ मे आहे. पहिली मध्ये‎ प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी‎ अनुसूचित जमातीचा असावा,‎ जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत‎ सोबत जोडावी, सोबत‎ जन्मतारखेचा पुरावा जोडावा.‎ पालकाच्या कुटुंबाची वार्षिक‎ उत्पन्नाची कमाल मर्यादा एक‎ लाखाच्या आत असावे. या‎ योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या‎ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश‎ अर्जासोबत संमती पत्र जोडावे.‎ विद्यार्थ्यांचे पालक शासकीय,‎ निमशासकीय नोकरदार नसल्याचे‎ पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला‎ ग्राह्य धरण्यात येईल. अपूर्ण‎ कागदपत्रे, तसेच खोटी माहिती‎ सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात‎ येणार आहे, असे एकात्मिक‎ आदिवासी विकास प्रकल्पाचे‎ प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले.‎