आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:आसलगाव केंद्रात शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिर; प्राथमिक शाळेत 30 मार्च रोजी उत्साहात पार

जळगाव जामोद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या मनातील शाळेची भीती घालवून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसलगाव केंद्रातील शिक्षकांचे व अंगणवाडीसेविकांचे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण आसलगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत ३० मार्च रोजी उत्साहात पार पडले.

सन २०२२-२३ पासून अभ्यासक्रमात अनेक बदल होत आहे. अंगणवाडी, बालवाडी ही प्राथमिक शाळा जोडली जाणार आहे. शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांना जाणून घेत, शाळेत दाखल झालेल्या शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सोपे व्हावे, यासाठी येणाऱ्या सत्रात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसलगाव केंद्राचे शाळापूर्व तयारी प्रशिक्षण केंद्रीय शाळा आसलगाव येथे पार पडले. यावेळी पुंजाजी ताडे व किशोर बोदडे यांनी शाळापूर्व तयारी बद्दल माहिती दिली. त्यानंतर केंद्रप्रमुख महादेव कुवारे यांच्या मार्गदर्शनात केंद्रातील शिक्षकांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या व पालकांच्या भूमिका सादर करून मेळावा पार पाडला.

या मेळाव्यात आसलगाव केंद्रातील मुख्याध्यापक, पहिली ते पाचवीचे शिक्षक व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन अनिल भगत यांनी तर आभार प्रसेनजित तायडे यांनी केले. प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती सय्यद, लता भड, गोपाल घाटे, विजय अवचार, प्रमोद इंगळे, सत्यजित बनसोड, सुखदेव भगत, सुरेश जाधव, ना. पा. बगाडे, जावेद पटेल यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...