आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभा मतदार संघात आरोग्य सुविधांची वानवा आहे. या मतदार संघात यापुर्वी कुठेही चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण केल्या गेल्या नाही. परंतू आ श्वेता महाले ह्या आमदार झाल्यापासून चिखली आणि बुलडाणा तालुक्यात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सतत धडपडत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी रायपूर आणि उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
असे प्रतिपादन डॉ राजेश्वर उबरहंडे माता सशक्त असतील तरच देशाचे भविष्य असलेली बालके सुदृढ होतील, या उद्देशाने २३ सप्टेंबर रोजी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियानांतर्गत गरोदर माता व बालक तपासणी तथा मातृत्व नोंदणी अभियान राबवण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य संदीप उगले, रायपूरचे सरपंच सुनील देशमाने, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सावजी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे, डॉ.उस्मान, शंकर तरमाळे, रेहान संजरी, खलील अहमद, किसन मांडवगडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.