आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:किसान सभेचा एसडीओ कार्यालयासमोर ठिय्या

खामगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज २३ नोव्हेंबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लावा, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, विनाअट पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा, निराधार शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावी, चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, आशा वर्कर व गट प्रवर्तकांना कायम सेवेत सामावून घ्यावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कॉ. जितेंद्र चोपडे, डॉ. विप्लव कवीश्वर, कॉ. रामचंद्र भारसाकळे, कॉ. प्रकाश पताडे, महेश वाकतकर, संगीता काळने, कनकलता इंगोले, सृष्टी कवीश्वर, कल्पना हिवराळे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...