आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सुनगाव परिसरात दोन देसी पिस्टल सह नऊ जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन आरोपीस पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जिवंत काडतुसांसह दोन देशी पिस्टल, दुचाकी असा एकूण सव्वा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई आज मंगळवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई केली आहे.
शहरातील सोनू भारत सावकर याच्याकडे देसी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता आरोपीने आपल्या दुचाकी मध्ये लपवलेली देसी पिस्टल व दोन जीवंत काडतूस पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा देशी कट्टा मध्य प्रदेश येथील अवतारसिंग नामक व्यक्तीने दिल्याचे सांगीतले. तसेच अवतारसिंग हा २१ जून रोजी देशी पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी निमखेड ते सुनगाव या मार्गावर सापळा रचला. आरोपी येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्यास ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल सात जिवंत काडतूस एक मोबाईल, दोन दुचाकी व नऊ जिवंत काडतूस असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक श्रावण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील अंबुलकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर भास्कर, पोलिस उपनिरिक्षक किशोर घोडेस्वार, रंजना आवारे, नामदेव सरकटे, पोहेकॉ. नीलेश पुंडे, पोहेकॉ संजय राऊत, नापोका उमेश शेगोकार, नापोकॉ अनिल सुशिर, नापोका अतुल मोहाडे, नापोकॉ शेख ईरफान, पोकॉ अमोल वनारे, पोकॉ सचिन राजपूत, पोका भारत गोंद्रे, पोकॉ मंगेश सोळंके, चालक योगेश माळी व पोलिस कर्मचारी डब्बे यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.