आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला बचत गट ही एक आर्थिक चळवळ आहे. यामाध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावले आहे. या चळवळीत काम करताना वेगळा आनंद मिळतो. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनचे काम सुरु केल्यापासून जिल्ह्यातील जवळपास एक हजारांहून जास्त बचत गटांचे पुनर्जीवन करता आले. भविष्यात बचत गट चळवळीचे काम आणखी जोमाने वाढवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी केले.
तालुक्यातील वाघजाळ फाटा येथील सरदार वल्लभभाई पटेल धान्य गोदाम येथे ९ मे रोजी जयश्री शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचतगट, कार्यकर्ता मेळावा व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, जिल्हा काँग्रेसचे सचिव सुरेश इंगळे, माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती उज्वला पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, सरपंच प्रकाशसेठ जयस्वाल, अवी पाटील, सुनील पाटील, डॉ.रवींद्र महाजन, डॉ.शरद पाटील, भोजराज पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, माजी सभापती उखा चव्हाण, रविशंकरसेठ मोदे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, मालती शेळके यांची उपस्थिती होती.
जयश्री शेळके पुढे बोलताना म्हणाल्या की, महिलांनी अशीच खंबीर साथ दिल्यास येणाऱ्या काळात त्यांच्या जीवनात यापेक्षा जास्त बदल घडेल, असा आशावाद जयश्री शेळके यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात जयश्री शेळके यांनी आपले नेतृत्व करावे, अशी मनीषा मंचावरील मान्यवर व उपस्थित महिलांनी व्यक्त केली. प्रारंभी जयश्री शेळके व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित महिलांची नेत्र तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. कार्यक्रमाचे संचालन गुलाब धोरण यांनी केले. तर आभार योगेश महाजन यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.