आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहनाचा प्रयत्न‎:स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष‎ पाटील यांचा आत्मदहनाचा प्रयत्न‎

खामगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान‎ झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान‎ भरपाई मिळावी. या मागणीसाठी‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎ जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील‎ यांनी १ फेब्रुवारी रोजी तहसील‎ कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन‎ आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.‎ मागील वर्षी अतिवृष्टीमुळे‎ झालेल्या नुकसान भरपाई मध्ये‎ खामगाव तालुका समाविष्ट‎ करण्यात यावा.

तसेच सन २०२२‎ मध्ये शेतकऱ्यांनी काढलेला पीक‎ विम्याची रक्कम तत्काळ‎ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा‎ करण्यात यावी या मागणी करीता‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाटील यांनी स्थानिक प्रशासकीय‎ इमारती मधील तहसील कार्यालयात‎ यांच्या कार्यालयात अंगावर डिझेल‎ घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.‎ पोलिस वेळेवर घटनास्थळी‎ पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ‎ टळला. पोलिसांनी पाटील यांना‎ ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई‎ सुरु केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...