आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविमा कंपनीविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज, िद. १९ कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने बैठक घेऊन पीक विमा मंजूर केला.
त्याचप्रमाणे पहिल्या टप्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर केली. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. परंतु, ती नियमानुसार देण्यात आली नाही. विमा तक्रारींचे निरसन करणाऱ्या समितीने मात्र दखल घेतली नाही. कारवाई होत नसल्याने विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.