आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक अनागोंदी:कायद्याच्या प्रवेश परीक्षेला सर्व्हरचा ‘खो’ ; विद्यार्थ्यांना मिळाला नाही पेपर सोडवण्यास वेळ

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलएलबीला प्रवेश मिळण्यासाठीची प्रवेश परीक्षा मंगळवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा देताना सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ परीक्षा देता आली नाही. काही विद्यार्थ्यांना तर पेपरही सबमिट करता आला नाही. या साऱ्या घोळामुळे पालकांनी मात्र जाब विचारण्यासाठी परीक्षा केंद्रावर धाव घेऊनही त्यांचे समाधान संबधित कंपनीच्या प्रतिनिधींना करता आले नाही.

बुलडाणा येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स या ठिकाणी परीक्षा आयोजित केली होती. सकाळी ९ ते ११ परीक्षा होती. परंतु ती दोन तास उशिरा म्हणजे ११ वाजेला सुरू झाली. दुपारी २ ते ४ यावेळेत उर्वरित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी या केंद्रावर ९० परीक्षार्थीची निवड करण्यात आली होते. त्यापैकी ७३ परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते.

केंद्र चालक- व्यवस्थापक म्हणतात, आमचा दोष नाही
या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली असता त्यांनी आमच्याकडे १०० संगणक सज्ज आहेत. सर्व सिस्टीमही तयार आहे. आम्ही आमचे परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिले आहे. पुढची जबाबदारी संबधित कंपनीची आहे.

शैक्षणिक नुकसान नाही
कंपनीचे प्रतिनिधी परमेश्वर जामकर म्हणतात की, उच्च दाबामुळे विद्युत पुरवठा करणारी वायरींग जळाली. त्यामुळे परीक्षा उशिरा सुरू झाली. आणि काही मिनिटातच सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे सिस्टीम काम करत नव्हती. यावेळी परीक्षेचे मुख्य समन्वयक भारत कदम हे हजर नव्हते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी
यंदा ही परीक्षा मंगळवारी विविध केंद्रांमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील संगणकात यांत्रिक बिघाड झाल्यामुळे पूर्ण कालावधीत परीक्षा देता आली नाही. त्या महाविद्यालयातील संगणकीय यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ९ वाजता सुरू होणारी परीक्षा उशिरा सुरू झाली. आणि त्यातही परीक्षा सुरू झाल्यानंतर सुद्धा काही काळ संगणक बंद होते आणि त्यानंतर जेव्हा संगणक सुरू झाले तेव्हा आम्हाला परीक्षेकरिता असणारा पूर्ण कालावधी न मिळता फक्त एकच तास मिळाला, अशी तक्रार मलकापूर येथील सौम्या सुहास चवरे या विद्यार्थिनीने शिक्षणाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.

लॉग इन व्हायला पंधरा मिनिटे लागली
अकरा वाजता पेपर स्टार्ट झाला. पण पंधरा मिनिटे माझे लॉग इन व्हायला वेळ लागला. त्यामुळे मी संगणक बदलला पण तोही हँग पडत होता. मी तीन वेळा संगणक बदलले होते.
-अनुराधा भड, धानोरा महासिद्ध, जळगाव जामोद

बातम्या आणखी आहेत...