आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:सात वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार ; आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावांतील सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका पंचेचाळीस वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. समाजाला कलंकित करणारी ही निंदनीय घटना ६ जूनच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या बुलडाणा येथे कामानिमित्त आल्या असता, त्यांची सात वर्षाची मुलगी घरी खेळत होती. यावेळी गावातीलच गणेश तुकाराम घाडगे वय ४५ या नराधमाने त्या चिमुरडीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार तिला सांगितला. हा प्रकार गावात समजल्या नंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाणेदार राजवंत आठवले यांनी तत्काळ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. त्यामुळे नागरिकांचा रोष कमी झाला. आज आरोपीस येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रायपूर पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...