आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली तालुक्यातील कव्हळा येथील पंचवीस वर्षीय युवतीस जबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.एन.मेहरे यांनी प्रत्येकी सात वर्षाची शिक्षा व २१ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
हा निकाल काल २० डिसेंबर रोजी देण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे की, ७ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास फिर्यादी शोभा कल्याणकर ही आपल्या आई समवेत घरी जेवण करीत असतांना दिपक अशोक राउळकर, अशोक पुंजाजी राउळकर, जिजाबाई अशोक राउळकर, मनीषा शिवदास घन, रेखा दीपक राउळकर, रामेश्वर देवराव राउळकर, लक्ष्मण देवराव राउळकर व नामदेव देवराव राउळकर सर्व रा.कव्हळा यांनी आमच्या जागेत सायकल का लावली? या कारणावरून घरात घुसले.
त्यापैकी दिपक अशोक राउळकर याने युवतीचे केस पकडून तिला ओढत बाहेर काढले तर अशोक व जिजाबाई यांनी हात पकडून ठेवले. त्यानंतर दिपक व मनिषा यांनी तिला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर रामेश्वर व नामदेव यांनी काठीने मारहाण केली. लक्ष्मणने दगड फेकून मारला. या मारहाणीत युवतीचे डोके फुटले. सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना युवतीने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. या जबाबाच्या आधारे अमडापूर पोलिसांत उपरोक्त आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर.एन.मेहरे यांनी आरोपीस प्रत्येकी सात वर्षाची शिक्षा व २१ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अॅड.सोनाली सावजी यांनी काम पाहिले तर त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ संजय ताठे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.