आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता देण्यात यावा; कर्मचारी संघटनेची मागणी

मलकापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालीका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देण्यात यावा, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे पालिका प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी कर्मचारी संघटने सोबत बरेच वेळा तडजोड करून अनेक मागण्यांची पूर्तता सुध्दा केली आहे.

परंतु अद्यापही काही महत्त्वपूर्ण मागण्या प्रलंबित आहेत. पालीका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता विनाविलंब देवुन डी. ए. एरियर्सची थकीत रक्कम, अंशदान निवृत्तीची थकीत रक्कम, बँक कर्जाचे कपात केलेले हप्ते भरणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे व न्यायालयाचे आदेशाने सेवेत कायम झालेले कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम आदी मागण्याबाबत अनेकवेळा नगर सेवक तथा समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांच्या मध्यस्थीने यशस्वी चर्चा करण्यात येऊन तत्त्वता मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु पालिकेची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने त्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

परंतु आज रोजी आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे उपरोक्त मागण्या विनाविलंब पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेचे शहर अध्यक्ष डी.के. टाक, अशोक रानवे, गणेश टाक, राजेश पथरोड यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...