आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराला कंटाळ:सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; घटनास्थळी पोलिस दाखल

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पातुर्डा येथील एका वृद्ध महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. रुख्माबाई काशीराम वसतकार असे मृतक महिलेचे नाव आहे.पातुर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये रुख्माबाई काशीराम वसतकार वय ७० ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. दरम्यान शनिवारी सकाळी वृद्ध महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त आजाराला कंटाळून वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. तामगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास बीट जमादार किशोर तिवारी करत आहे. मृतक महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सुन, दोन मुली व नातवंडे आहेत.

बातम्या आणखी आहेत...