आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाण्यासाठी सावळा ग्रामस्थांचे आंदोलन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सावळा गावाला किमान तीन दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी सावळा येथील ग्रामस्थांनी शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुंदरखेड ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुंदरखेड, सावळा व हनवतखेड अशी तीन गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे. त्यापैकी सावळा गावाची लोकसंख्या दीड ते दोन हजाराच्या आसपास आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून या गावाला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दहा दहा दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांसह जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावाला पाणी पुरवठा करण्यास सुंदरखेड ग्रामपंचायत प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सावळा ग्रामस्थांना उन्हाच्या चटक्यासोबत पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. पाणी असूनही सावळा गावाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. जनावरांसह ग्रामस्थांची पाण्यापासून होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सावळा गावाला किमान तीन दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी सावळा ग्रामस्थांनी शनिवारी सुंदरखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात लखन गाडेकर, अनिल जगताप, सुरेश जगताप, भानुदास जगताप, भरत जगताप, सुभाष जगताप, अरुण जगताप, गोकुळ जगताप, कैलास इंगळे, ओम राजपुत, नितीन जगताप व भागवत जगताप यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...