आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बालपणापासून जपला शाडूचे गणराय निर्मितीचा छंद ; वडिलोपार्जित व्यवसाय

खामगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या दहाव्या वर्षापासून शाडूच्या मातीपासून गणरायाच्या मूर्तीसह विविध देवतांची मूर्ती घडवण्याचे काम आपल्या कलारुपी हातून येथील शिवाजी वेस भागातील अमोल चिकाने करत आहेत. आज त्यांचे वय ३५ वर्षाचे आहे. चिकाने परिवाराचा मूर्तीसह विविध संसारोपयोगी भांडी बनवण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. मातीपासून मूर्ती कशी बनवावयाची याचे शिक्षण अमोल याने त्यांच्या वडिलांकडून घेतले. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून या व्यवसायात कशी प्रगती करता येईल, यासाठी ते दरवर्षी विविध प्रयत्न करत आहेत.

कोरोनामुळे गणपतीच्या मूर्तीसह अन्य देवदेवतांच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध लादले होते. याचा फटका मूर्तिकारांना बसला असून, त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. कोनाचे दोन वर्षाचे निर्बंध उठवल्याने यंदा चिकाने यांनी एक फुटापासून ते सात फूट उंचीच्या शाडूच्या मातीपासून सुरू केले आहे. यंदा त्यांनी नऊ इंचापासून ते दीड फुटापर्यंत ४०० ते ५०० मूर्ती, तर सात फुटांपर्यंत केवळ दहा मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्ती बनवण्याकरिता त्यांना त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत, पुतणे जगदीश व दिगंबर, चुलत भाऊ प्रवीण वझे व परिवारातील सदस्यांची मदत मिळत आहे. गणेशोत्सवाला तीन आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे आणि मूर्तीचे काम भरपूर प्रमाणात बाकी असल्याने ते पूर्ण करण्यासाठी रात्र रात्रभर काम करत आहे. किमान गणेशोत्सवाच्या एक आठवड्याआधी मूर्ती कलरिंग करून विक्रीस ठेवता येईल. यासाठी चिकाणे हे प्रयत्नरत आहेत.

मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडूच्या मातीसह पूर्णा नदीची माती, गवत, सुतळी, लाकडे, रंग आदी साहित्याच्या किमतीत गत वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मागील वर्षी २०२१ मध्ये शाडूच्या मातीची ४० किलोची बॅग ३५० रुपयांचा मिळायची ती यंदा ५०० रुपयाला मिळत आहे. पूर्णा काठची माती गेल्या वर्षी २ हजार ५०० रुपये ब्रास मिळायची. त्यात १ हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मातीसाठी ४ हजार रुपये मोजावे लागले. गत वर्षी सुतळी ७० रुपये किलो होती, तर ती यंदा ११० रुपयांवर गेली आहे. सोनेरी रंगासह अन्य रंगाच्या किंमत सुमारे २० टक्के दरवाढ झाली असल्याचे चिकाने यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...