आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहीरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आत्मभान जागृत करणाऱ्या शाहिरांमध्ये अग्रगण्य नाव म्हणजे शाहीर बाबुसिंग राजपूत. लोककलेतील त्यांचे असीम योगदान आणि शाहिरीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी वेचलेल्या आयुष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या ३६ व्या स्मृतिदिनी शाहिरी शिवगर्जना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संभाजीनगर- औरंगाबादचे शिवशाहीर सुरेश जाधव आणि त्यांचे सुपुत्र शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव हे पिता-पुत्र शाहिरी शिवगर्जना कार्यक्रम सादर करतील. शुक्रवार, ६ जानेवारी रोजी बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा मतदार संघाचे आ. संजय गायकवाड राहतील. प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर उपस्थित राहतील. तर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय अंभोरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा अर्थात शाहिरी लोककलेचे दणकेबाज सादरीकरण पाहण्यासाठी शाहिरी शिवगर्जना कार्यक्रमाला कला रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शाहीर बाबुसिंग राजपूत कलामंचकडून करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.