आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:न्यायासाठी शाहू महाराजांनी आयुष्य वेचले; प्रा. गायकी यांचे प्रतिपादन राजे; शाहू महाराजांना अभिवादन

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात सामाजिक न्यायाची प्रतिस्थापना करण्यासाठी शाहू महाराज यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख प्रा. गोविंद गायकी यांनी केले.

धामणगाव बढे येथील राजे छत्रपती कला महाविद्यालयात आज ६ मे रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञता पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांना सकाळी ठिक दहा वाजता शंभर सेकंदांची आदरांजली देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अविनाश मेश्राम हे होते. तर विचार मंचावर मराठी विभाग प्रमुख प्रा. गोविंद गायकी व प्रा डॉ नितीन जाधव उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात प्रा डॉ. महादेव रिठे यांनी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. यानंतर प्रमुख वक्ते प्रा डॉ गोविंद गायकी म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे एक आदर्श राजा होते, समाजामध्ये सामाजिक न्यायाची प्रतिस्थापना करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यानंतर प्रा. डॉ. नितीन जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.अविनाश मेश्राम म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वसामान्य जनतेसाठी फार मोलाचे आणि भरीव कार्य केले आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांच्या दूरद्रूष्टी नेतृत्वामुळेच आज दिसून येते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन आयक्यूएसी, नॅक आणि करिअर कट्टा या विभागामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माल्यार्पण नंतर शंभर सेकंदांची आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव रिठे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विजय मोरे, डॉ.भगवान गरुडे, डॉ. शाहिदा नसरीन, डॉ. कामिनी मामर्डे, प्रा. दीपक लहासे, डॉ स्वप्नील दांदडे, गजानन मालठाणे, विष्णू उबाळे, संदीप तोटे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...