आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहकर:मेहकर येथे शिवसेनेतर्फे शंकरपट स्पर्धा उत्साहात

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आयोजित भव्य जंगी शंकर पटाचे ५ जून रोजी खासदार प्रतापराव जाधव व आ.संजय रायमूलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. २ लक्ष रुपयांच्या बक्षिसाची जंगी लुट या शंकरपटात होणार आहे. जनरल गट व गावगाडा गटात ही स्पर्धा रविवार व सोमवारी होणार आहे.

स्थानिक बायपास रोडवर कास्तकार चौकात या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवार रोजी सकाळी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमूलकर यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत फीत कापून शंकरपटाचे उद्घाटन केले. त्यानंतर खा.प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांनी स्वतः बैलगाडा पळवला.

यावेळी जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठीया, युवा सेना तालुका अधिकारी भुषण घोडे, उपसभापती बबनराव तुपे, युवा नेते योगेश जाधव, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख, माजी नगरसेवक माधव तायडे, ओम सौभागे, रामेश्वर भिसे, भास्करराव राऊत,भास्करराव घोडे, उद्योजक किशोर गारोळे, संतोष पवार, संजय निकम, विनोद घोडे, सुनील सुर्जन, श्याम इंगळे, मोहन जाधव, माजी सभापती राजू घनवट, बाळू जाधव यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...