आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मुदत संपलेल्या दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी ९४३९ मतदार पैकी ७९९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३६७६ महिला व ४३१४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
या मतदानाच्या मतमोजणीसाठी तहसील प्रशासन सज्ज झाले असून ही मत मोजणी तीन टेबलावर होणार आहे. त्यानंतर निकाल घोषीत करण्यात येणार आहेत. परंतु तोपर्यँत सरपंच व सदस्यांना काही तासांपुरती वाट पाहावी लागणार आहे. तालुक्यातील कठोरा, चिंचखेड, संगोडा या गावचे निकाल सर्व प्रथम लागणार आहेत. यावेळी सदस्य पदाचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे निकाल जाहीर करण्यात येतील. त्यानंतर माटरगाव खुर्द, खातखेड, कुरखेड, तिव्हान खुर्द, पाळोदी, येउलखेड व लासुरा खुर्द या ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.