आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाला लोकसभेची उमेदवारी नाही?:अमरावती अन् बुलढाण्यात भाजपचे खासदार होणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे वक्तव्य

बुलढाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यात आणि अमरावतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल असे वक्तव्य केले आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर खासदारांनीही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वाकारले आहे. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर आता शिंदेंगटातील खावसदारांची धाकधूक वाढली आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपच्या कमळ चिन्हावरचा द्यावा लागेल असे म्हटल्याने शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव यांची धाकधूक वाढली आहे. 2024 मध्ये बुलढाण्यातून आपणच शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असणार असे अशी आशा जाधवांना आहे. मात्र बावनकुळेंच्या वक्तव्याने जाधवांच्या आशेवर पाणी फिरले असून उमेदवारी मिळणार की नाही यामुळे धाकधूक वाढली आहे.

लोकसभेला भाजपचे मिशन 45

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच, लोकसभेसाठी मिशन 45 असा नारा दिला आहे. यातच ते राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून त्यांनी अमरावती आणि बुलढाण्यात वक्तव्य केले आहे की, अमरावतीचा पुढील खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार हा भाजपचा असेल यामुळे शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसुळ यांना धक्का बसणार आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारत पुढील लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती. यावेळी त्यांचा पराभव नवनीत राणांनी केला, त्या भाजपमध्ये गेल्यास भाजप त्यांना तिकीट देईल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर बुलढाण्यात बोलताना बावनकुळे म्हणाले की पुढचा खासदार हा भाजपचा होणार असे वक्तव्य केल्याने प्रतापराव जाधवांची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जाधव तिसऱ्यांदा निवडून आले

खासदार प्रतापराव जाधव हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर बडनेरामधून रवी राणा दुसऱ्यांदा आमदार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बावनकुळे यांनी पुढील लोकसभा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरील असेल असं सांगितल्याने शिंदे गट आणि भाजपात पेच वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...