आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे; खासदार प्रतापराव जाधव यांचे निर्देश

बुलढाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक १ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत शेगाव व संग्रामपूर येथील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी तसेच आगामी होणाऱ्या नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेनेची पक्ष बांधणी, विस्तार, संघटन याचबरोबर पक्षाला बळकटी प्राप्त करण्याच्या हेतूने आपल्याला जे जे सकारात्मक पावले उचलता येईल. संघटितरीत्या कार्य कसे करता येईल, ते सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे, तसेच विकासाची घोडदौड कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर, नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच प्रत्येक शिवसैनिकाने भगवा फडकवण्यासाठी निर्धार करावा, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या. तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विकास कामांची गती वाढली आहे.

विकासाचा झंझावात कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर देखील शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हा प्रमुख राजू मिरगे, तालुका प्रमुख रामा थारकर, अरुण पाटील, दिनेश शिंदे, संतोष घाटोड, गजानन हाडोळे, आशिष गणगणे, शैलेश डाबेराव, तालुका प्रमुख संग्रामपूर रवींद्र झाडोकार, संतोष लिप्ते, दत्ता पाटील कुरखेड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...