आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा संपर्कप्रमुख पदी नरेंद्र खेडेकर:बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या नियुक्त्या ठाकरेंकडून जाहीर

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या असून बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुखपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली.मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी बुलडाण्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी नव्या जोमाने संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागा असे आवाहन वजा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. बुलडाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी गद्दार झाले असले तरी शिवसैनिक हा पक्षासोबतच आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवूच अशी ग्वाही दिली.

जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छगन मेहत्रे यांना सहसंपर्कप्रमुख (बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा आणि मेहकर विधानसभा) म्हणून नियुक्ती देण्यात आली. उपजिल्हाप्रमुखांमध्ये प्रा. आशिष रहाटे (मेहकर विधानसभा), संजय हाडे (बुलडाणा विधानसभा), संजयसिंग जाधव (मलकापूर विधानसभा), अविनाश दळवी (खामगाव-शेगाव) तर विधानसभा संघटक म्हणून अशोक इंगळे (बुलडाणा विधानसभा), रवी महाले (खामगाव विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाप्रमुखपदी निंबाजी पांडव (मेहकर), महेंद्र पाटील (सिदखेडराजा), संदीप मापारी (लोणार), ईश्वर पांडव (नांदुरा), दीपक पाटील (मलकापूर), विजय बोदडे (खामगाव) तसेच शहर प्रमुख म्हणून किशोर गारोळे (मेहकर), गजानन जाधव (लोणार), हेमंत खेडेकर (बुलडाणा), विठ्ठल जगदाळे (मलकापूर) रमेश ताडे (जळगाव जामोद) शुभम घाटे (संग्रामपूर), विजय इंगळे (खामगाव), योगेश पल्हाडे (शेगाव) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जालिंदर बुधवत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...