आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मेळावा:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

बुलडाणा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायबाप शेतकरी बांधवांच्या वाढलेल्या आत्महत्या, खरीप हंगामात अतिवृष्टीने केलेला कहर, यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान आणि त्यातही केंद्र व राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची मदत मिळायला होत असलेला उशीर या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अश्रू पुसण्याचे काम करत आहे. चिखली येथे याच अनुषंगाने शेतकरी संवाद मेळावा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले आहे.

चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवार, २६ नोव्हेंबर दुपारी तीन वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते यांची उपस्थिती राहणार आहे, या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी संयुक्तरीत्या केले आहे.

बातम्या आणखी आहेत...