आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना चर्चेत असताना बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदार नॉट रिचेबल आहे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना विचारले असता, बुलडाणा जिल्हातील शिवसेना एकसंघ राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांमध्ये जिल्ह्यातील डॉ. संजय रायमूलकर व आ. संजय गायकवाड हे दोन आमदार आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा हा शिवसेनेचा बंडाच्या दृष्टीने चर्चेत आला आहे. खा. प्रतापराव जाधव यांचाही या आमदारांशी संपर्क झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटते हे जाणून घेतले.
यामध्ये जिल्हाप्रमुख बुधवत यांनी मातोश्री हेच आमचे दैवत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आमचे सर्वस्व आहे, असे सांगत जिल्हा शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या एकसंघ राहिल असेही म्हणाले. तसेच या दोन्ही आमदारांना परत आणण्याच्या दृष्टीने संपर्काचा प्रयत्न करत आहोत. मात्र तो होत नसल्याचेही सांगितले. काहीही झाले तरी शिवसेना मात्र येथे संघटन दृष्टीने एकसंघ राहिल. त्यात काहीही बदल होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख लखन गाडेकर, जिल्हा प्रवक्ता गजानन धांडे उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.