आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:कोश्यारी यांच्या निषेधार्थ‎ शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन‎

संग्रामपूर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे‎ राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती‎ शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य‎ केले. याचे पडसाद संग्रामपूर तालुक्यात‎ उमटले असून शिवसेनेच्या वतीने राज्यपाल‎ व भाजपा प्रवक्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारुन‎ निषेध आंदोलन करण्यात आले.‎ तालुका शिवसेनेच्या वतीने वरवट बकाल‎ बसस्थानकासमोर राज्यपाल भगतसिंह‎ कोश्यारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या‎ प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन‎ करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी‎ त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात‎ घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात‎ शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार,‎ तालुका उपप्रमुख कैलास कडाळे, किसान‎ सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे, प्रल्हाद‎ अस्वार, भैय्या घिवे पाटील, शहर प्रमुख‎ शुभम घाटे, पातुर्डा खुर्द शहर प्रमुख नीलेश‎ झाडोकार, राहुल मेटांगे, विशाल बांगर,‎ गोपाल चोपडे, प्रशांत इंगळे, भगवान पवार,‎ चेतन बकाल, अंकुश कड यांच्यासह संभाजी‎ ब्रिगेड व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...