आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू ; पाच हजार सदस्य नोंदणीचा निर्धार

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियान टॉवर चौक येथे करण्यात आले. या सभासद नोंदणीला १३ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याच्या पाठीशी उभे राहण्याकरिता हे अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी माजी तालुका प्रमुख प्रा.डॉ.अनिल अमलकार याच्या नेतृत्वाखाली खामगाव मतदार संघात जवळपास पाच हजार सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सदस्य नोंदणी अभियानास जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव भोजने याच्या मार्गदर्शनाखाली अभियानास सुरुवात करण्यात आली. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने शिवसेनेकडे सामान्य माणसासोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे. तालुक्यातील हजारो शिवसैनिकांचे सदस्य नोंदणी करत अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी रवी महाले, विजय बोदडे, विजय इंगळे, सूरज बेलोकार, गणेश सरोदे, प्रमोद कवडे, भारती चिडाले, सुरेखा चिलवनंत, श्रुती पलिंगे, दीपाली श्रीमान, भगवान इंगळे, आनंद चिडाले, सागर पाटोळे, नंदकिशोर भरसाकळे, शुभम देशमुख, आशिष नांदे, विठ्ठल बघे, प्रज्ज्वल थोटागे, ऋषिकेश राठोड आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...