आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:‘बुलडाण्यात शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात धुडगूस घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आवारात ३ सप्टेंबर रोजी होत असलेल्या कार्यक्रमास धुडगूस घालणाऱ्यावर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार समाधान सोनवणे यांना सादर केले.शिवसेना पदाधिकाऱ्यांचा ३ सप्टेंबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी मेळाव्यात शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांचे २० ते २५ समर्थक यांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घातला या घटनेचा शिवसैनिक तीव्र शब्दात निषेध करत आहेत. जिल्हा व पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन दोषीवर कडक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असे नमूद केले आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, रमेश पाटील, शहरप्रमुख योगेश पल्हाडे, गजानन हाडोळे, नगरसेवक दिनेश शिंदे, नगरसेवक आशिष गणगने, प्रभारी तालुका प्रमुख दत्ता वाघमारे,किसान सेना तालुका प्रमुख अजय अहीर, मा.उपशहर प्रमुख सुधाकर शिंदे, युवासेना शहरप्रमुख शिवा कराळे, अमोल चव्हाण,शुभम लोखंडे, विशाल लहाने,अरुण सिहस्थे,पंकज लोखंडे,पंकज पवार, मोहन लांजुळकर यांच्यासह शिवसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...