आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तांतरणाचा प्रश्न:वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यासाठी शिवसेनेचा ठिय्या

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेले शासकीय वसतिगृह विद्यार्थ्यांकरिता खुले करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने २ सप्टेंबर रोजी वसतिगृहा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.खामगाव - वाडी दरम्यान पॉलिटेक्निक, आय.टी.आय.जवळ विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्याक विभागाकडून शासकीय वसतिगृह बांधण्यात आले आहे. या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र हे वसतिगृह अद्यापही विद्यार्थ्यांसाठी उपयोगात न येता धूळ खात पडलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहाची इमारत पूर्णत्वास नेली. मात्र अद्यापही या वसतिगृहात इलेक्ट्रिक मीटर बसवण्यात आले नाही तसेच हस्तांतरणाचा प्रश्न अडगळीत पडला आहे. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत हे वसतिगृह विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी तालुका प्रमुख प्रा. अनिल अमलकार, विधानसभा प्रमुख रवी महाले, तालुका प्रमुख विजय बोदडे, देविदास उमाळे, सुभाष ठाकूर, आनंद चींडाले, पंजाबराव पेसोडे, नीलेश पारसकर, प्रकाश खंडारे, प्रज्ज्वल थोटांगे, गणेश सरोदे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...