आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२३-२४ च्या अध्यक्षपदी येथील नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शोण चिंचोले यांची निवड केली आहे. येथील विश्रामगृहावर ११ डिसेंबरला सायंकाळी पार पडलेल्या समितीच्या बैठकीत सर्वानुमते डॉ. शोण चिंचोले यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी शिवजयंती समितीचे माजी अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, राजेश हेलगे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, सागर काळवाघे, अॅड. जयसिंगराजे देशमुख, कुणाल गायकवाड, प्रा. अनिल रिंढे आदींची उपस्थिती होती. सचिव सुनील सपकाळ यांनी विषयाची मांडणी करून नवीन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.