आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही; आमदार एकडे यांचा इशारा

मलकापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून अपमान केल्याबद्दल त्यांचा आज २३ नोव्हेंबर रोजी शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले.

त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांना अटक करावी. अन्यथा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आमदार राजेश एकडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना आमदार राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते, अॅड. साहेबराव मोरे, मनोज देशमुख, उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...