आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दिन विशेष:शिवाजी करून देतो सैनिकांची मोफत बुट पॉलिश

प्रवीण थोरात| बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊन, वारा, थंडी व पावसाची तमा न बाळगता सैनिक चोवीस तास डोळ्यात तेल घालून देशाच्या सिमेचे रक्षण करतात. त्यामुळेच देशातील सर्वसामान्य जनता शांततेत असते. देशसेवेत असलेल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील धाड येथील चाळीस वर्षीय शिवाजी भिका परमेश्वर यांनी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सैनिकांची मोफत बूट पॉलिश करुन देण्याचा संकल्प त्यांनी २०१२ पासून सुरु केला आहे. आजही ते सैनिक, माजी सैनिकांना बुटपॉलीशची मोफत सेवा देत आहेत. ज्या कुटुंबात प्रथमच कन्यारत्न प्राप्त झाले. त्या व्यक्तीच्या कुटूंब प्रमुखाच्या बुटाची पॉलिश ते मोफत करुन देत आहेत. धाड येथील शिवाजी भिका परमेश्वर यांचे धाड येथील बसस्थानकात जनसेवा बूट हाऊस या नावाचे प्रतिष्ठान आहेत. ते बूट हाऊसच्या माध्यमातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. सोबतच भल्या पहाटे दिव्य मराठीाचे वितरण करतात. कुटुंबात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. दिव्यांग असल्यामुळे त्यांना संजय गांधी योजने अंतर्गत एक हजार रुपये मानधन मिळते. परंतु हे मानधन नियमित मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २००७मध्ये बीएचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतरही नोकरी न लागल्यामुळे त्यांनी कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अतिक्रमित जागेत दुकान थाटले होते. परंतु काहींनह त्यांना त्या जागेवरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे २०१६ मध्ये शासनाकडून भाडेपट्यावर जागा उपलब्ध करुन द्यावी अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे मागितली होती.

आपल्या हातून देश सेवा घडावी, हीच इच्छा
स्वत: दिव्यांग असल्यामुळे सैनिक होण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही, ही खंत सतत छळत होती. त्यामुळे सैनिकांच्या बुटाची मोफत पॉलिश करुन द्यावी, ही गाठ मनाशी बांधली. यामाध्यमातून असंख्य सैनिकांच्या बुटाची पॉलिश मोफत करुन देत आहे. त्या सोबतच बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम कन्यारत्न प्राप्त कुटुंबातील प्रमुख व्यक्तींच्या बुटाची देखील मोफत पॉलिश करुन देत आहे. -शिवाजी भिका परमेश्वर, जनसेवा बूट हाऊस, धा

बातम्या आणखी आहेत...