आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी:मेहकरमध्ये टॉवरवर चढून महिलेचे‎ पतीसाठी "शोले'' स्टाईल आंदोलन‎

मेहकर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीवर पोलिसांनी खोटा गुन्हा‎ दाखल केल्याचा आरोप करत, तो‎ रद्द करण्याच्या मागणीसाठी एका‎ महिलेने शुक्रवारी टॉवरवर चढून‎ "शोले'' स्टाईल आंदोलन केले.‎ रुक्मिणी गजानन बोरकर (रा.‎ सारंगपूर) असे या महिलेचे नाव‎ आहे.‎ काही दिवसांपूर्वी घरासमोरील‎ एका व्यक्तीने रुक्मिणी बोरकर या‎ महिलेकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव‎ केले होते. याबाबत तिने त्या व्यक्तीला‎ जाब विचारला. तसेच पती गजानन‎ बोरकर यांच्यासह ती मेहकर येथील‎ पोलिस ठाण्यात आली होती.‎ पोलिसांनी तत्काळ तक्रार न घेता चार‎ ते पाच तास बसवून ठेवल्यावर‎ संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल‎ केला.

त्यानंतर रात्री उशिरा गजानन‎ बोरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दाखल केला, असा आरोप रुक्मिणी‎ बोरकर हिने केला होता. तसेच माझ्या‎ पतीचा व संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा‎ काहीही संबंध नव्हता. तसेच आम्ही‎ चार ते पाच तास पोलिस ठाण्यात‎ होतो. असे असतानाही पतीवर‎ विनयभंगाचा गुन्हा दाखल कसा‎ झाला, अशी विचारणा तिने केली‎ होती.‎ पतीवर खोटा गुन्हा दाखल‎ करण्यात आला असून, तो खारीज‎ करावा, अन्यथा दि. १० मार्च रोजी‎ टॉवरवर चढून आंदोलन करण्यात‎ येईल, असे निवेदन तिने प्रशासनाला‎ दिले होते.

त्यानंतरही प्रशासनाने‎ संपर्क केला नाही. त्यामुळे आज‎ सकाळी रुक्मिणी बोरकर हिने‎ तहसीलच्या परिसरातील टॉवरवर‎ चढून आंदोलन केले. यावेळी‎ तहसीलदार आणि पोलीस‎ अधिकाऱ्यांनी दिलेल्या‎ आश्वासनानंतर रुक्मिणी बोरकर हिने‎ आंदोलन मागे घेतले. दरम्यान,‎ पोलिसांनी तिला ताब्यात घेवून‎ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा‎ दाखल केला.‎

बातम्या आणखी आहेत...