आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉटसर्कीट:तहसील कार्यालयाच्या सभा हॉलच्या वायरिंगमध्ये शॉटसर्कीट; भिंतीवरील पंखा जळून खाक

मेहकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय जळाल्याची घटना ताजी असतानाच आज ५ एप्रिल रोजी तहसील कार्यालयातील सभेच्या हॉलमधील वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट होऊन वायरिंग जळाली. या घटनेत भिंतीवरील पंखा जळून खाक झाला आहे. सुदैवाने तहसिल कार्यालयातील कर्मचारी संपावर असल्याने कुठलीच जिवित किंवा वित्त हानी झाली नाही.

ही घटना आज मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तहसीलदार संजय गरकल यांनी प्रत्येक कार्यालया बाहेर कोतवालाची नियुक्ती केली आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या एका कोतवालास मिटींग हॉल मधून धूर निघत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी तत्काळ तहसीलदार संजय गरकल यांना या घटनेची माहिती देऊन वायरिंगला लागलेली आग विझविली. परंतु तोपर्यंत हॉलमधील पंखा जळून खाक झाला होता.

ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. रात्री घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. या हॉलच्या डाव्या बाजूला संजय निराधार योजनेचे कार्यालय असून मिटींग हॉलमध्ये तहसीलचे रेकॉर्ड आहे. तर उजव्या बाजूला पुरवठा विभाग आहे. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने हानी टळली. सार्वजनिक बांधकाम विभागातील इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी हे उद्या बुधवारी तहसील कार्यालयातील वायरिंगची पाहणी करणार असल्याचे तहसीलदार संजय गरकल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...