आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष:श्रमदान, स्वखर्चाने पुलावरील खड्डे बुजवले; सातगाव येथील युवकांचा समाजोपयोगी उपक्रम

धाड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नदीपात्रामुळे विभक्त झालेल्या सातगाव येथील दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. परंतु या खड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. अपघाताला आळा घालण्यासाठी बांधकाम विभागाची वाट न पाहता गावातील युवकांनी स्वखर्चाने व श्रमदान करून पुलावरील खड्डे बुजवून रहदारी सुरळीत केली. दोन्ही गावांना जोडण्यासाठी तसेच हा रस्ता पुढे कुलमखेड मार्गे मराठवाड्यातील मोहलाई, सावंगी दानापूर, भोकरदनला जोडल्या गेल्याने धाडला येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणुन या रस्त्याचा वापर करण्यात येतो.

नदीवर पूल बांधण्यात आला असून पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहने नदी पात्रात पडण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली होती. नागरिकांची व वाहन चालकांची होणारी अडचण पाहता गावातील सामाजिक कार्यकर्ते हुसेन सतिहास, पावन यंगड, आकाश गिरी, मंगेश यंगड, सावन यंगड, राजू यंगड यांच्यासह इतर युवकांनी स्वखर्चाने व श्रमदान करून या पुलावरील खड्डे बुजवले. त्यामुळे दोन्ही गावातील वाहनधारकांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...