आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ:सामाजिक दायित्वाची परंपरा जपणारे देऊळगाव माळीतील श्री मारोती गणेश मंडळ

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध सामाजिक उपक्रमाची परंपरा जपणारे मंडळ म्हणून तालुक्यातील देऊळगाव माळी येथील श्री मारुती गणेश मित्र मंडळ यांची ओळख आहे. या मंडळाला २२ वर्षे पूर्ण झाली असून दरवर्षी मंडळाकडून नाविन्यपूर्ण व सामाजिक संदेश तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ७०० रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.४ सप्टेंबर रविवार रोजी श्री.मारोती गणेश मित्र मंडळ व डॉ. विशाल मगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी डॉ. विजयकुमार गिऱ्हे, डॉ. विशाल सुरुशे, डॉ. अनंता मगर, डॉ. विशाल मगर, डॉ. प्राची गिऱ्हे, डॉ. अरुण गिऱ्हे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील सुलताने, डॉ. सचिन सानप, डॉ. डी. व्ही. सुरुशे, डॉ. प्रवीण गाभणे, डॉ. गजानन गिऱ्हे, डॉ. रवी जमदाडे, डॉ. शिवशंकर बळी, डॉ. बद्री मगर, डॉ. मधुसूदन राऊत, डॉ. जयराम मगर, डॉ. राम जमधाडे या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. यावेळी मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रवी मोरे, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर रिंढे यांची उपस्थिती लाभली. या शिबिरासाठी वैभव इंगळे, आकाश राऊत, पवन कंकाळ, राम खरात, मंगेश सोनवणे, शिवाजी मगर, विनोद मगर, माधव बळी, अभिमन्यू मगर, नरेंद्र गीऱ्हे, समाधान मगर, राहुल मगर या फार्मासिस्ट मंडळींचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी श्री.पांडुरंग संस्थानचे कार्यकारी मंडळ, कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...