आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरणाची परवानगी:श्री सत्यसाई ट्रस्ट शेगावच्या 2 शाळांना देणार पोषण आहार ; मोफत देणार असल्याची घोषणा

शेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेच्या म. फुले प्राथमिक शाळा क्र. २ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्र. ६ मधील विद्यार्थ्यांना कर्नाटकातील श्री सत्यसाई अन्नपूर्णा ट्रस्ट आता शालेय पोषण आहार मोफत पुरवणार आहे. नगर पालिकेने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून या ट्रस्टला पोषण आहार वितरण करण्याची परवानगी दिली आहे.

नगर परिषद अंतर्गत महात्मा फुले न. प. प्राथमिक मराठी शाळा क्र. २ येथे १३२ विद्यार्थी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. प्रा. मराठी शाळा क्रं. ६ मध्ये ६९ विद्यार्थी आहेत. या शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार कार्यक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर विद्यार्थ्यांच्या पालकांची मुख्याध्यापकांमार्फत परवानगी घेऊन पोषण आहार वाटप करण्यास नगर पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी अनुमती दिली आहे. श्री सत्यसाई अन्नपूर्णा ट्रस्ट, मुददनहाली जि. चिक्काबाल्लापूर (कर्नाटक)चे ट्रस्टी व सेक्रेटरी आनंद कुमार काडली यांना याबाबत पोषण आहार वितरीत करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...