आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतीच्या प्रवासाला असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पायी वारीचे शहरात भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात शुक्रवारी स्वागत केले. दरम्यान, आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान शहराच्या वेशीवर पालखीचे आगमन होताच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रशासक तथा तहसीलदार डॉ. संजय गरकळ, मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले.
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे शहरात शुक्रवार रोजी श्रींच्या पालखीच्या आगमनाने चोहीकडे धार्मिक वातावरण दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा भावी भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. लोणार वेस चौकात भक्तांनी पालखीसह वारकऱ्यांवर मशीनद्वारे रंगीबेरंगी पताकांची उधळण केली. तसेच भाविकांनी वारकऱ्यांना फराळ साहित्याचे वाटप केले. शहरापासून जवळच असलेल्या बरटाळा फाटा येथे आ. डॉ. संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जाधव यांनी श्रींचे दर्शन घेतले.
तर लोणार वेस चौकात काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, अॅड. अनंत वानखेडे, पंकज हजारी, राजेश अंभोरे, कैलास सुखदाने, युनूस पटेल, छोटू गवळी यांच्यासह आदींनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. शहरातील व्यावसायिक प्रदीप शेळके आणि त्यांच्या चमूने पालखीसोबत स्वच्छता मोहीम राबवली. दरवर्षी पालखीचा मुक्काम शहरातील प्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी मंदिरात असायचा, मात्र मागील ५३ वर्षांची परंपरा खंडित होऊन या वर्षी श्रींच्या पालखीचा मुक्काम स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल येथे आहे. तर वारकऱ्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था एम. ई. एस. हायस्कूल येथे करण्यात आली. शहरातील व्यावसायिक रवीकुमार अग्रवाल यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखीच्या आगमन प्रसंगी ठाणेदार निर्मला परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.