आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सुध्दा श्रींचा १४५ वा प्रगट दिन उत्सव सोमवार, आज ६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाच्या पुजन करुन श्रींच्या प्रगट दिन उत्साहाला सुरुवात झाली. यावेळी भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाकरिता गर्दी झालेली आहे. श्री संत गजानन महाराज मंदिरात आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यामध्ये सकाळी ५ ते ६ काकडा ,७.१५ ते ९ .१५ भजन , दुपारी ४ ते ५ प्रवचन , सायंकाळी ५ ते ५.३० हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे. ६ फेब्रुवारी ह.भ.प.मंगेशबुवा वराडे, मोताळा ७ फेब्रुवारी ह.भ.प.प्रकाशबुवा शास्त्री, धुळे, ८ फेब्रुवारी ह.भ.प.रामबुवा डोंगरे जाटनांदूर , ९ फेब्रुवारी ह.भ.प.सचिदानंदबुवा कुलकर्णी परभणी, १० फेब्रुवारी ह.भ.प.ज्ञानेश्वरबुवा ईटखेडे, मेहूण, ११ फेब्रुवारी ह.भ.प.अनंतबुवा बिडवे बार्शी, १२ फेब्रुवारी ह.भ.प.श्रीहरी बुवा वैष्णव जालना, १३ फेब्रुवारी ह.भ.प.श्रीराम बुवा ठाकूर परभणी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
तर १३ फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन असल्याने या दिवशी सकाळी १० ते १२ ह.भ.प.श्रीरामबुवा ठाकूर परभणी याचे शेगावी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त किर्तन होईल. तर १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाची पुर्णाहूती होईल. दुपारी श्रींची पालखी अशव, रथ सह परिक्रमा करीता निघेल. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन ह.भ.प.प्रमोदबुवा राहणे पळशी यांचे होईल व या प्रगट दिन उत्सवाची सांगता होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.