आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात; भगवंतांना ५६ भोग अर्पण बालकांनी केली कृष्ण, राधाची वेशभूषा

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृअत संघ (इस्कॉन) संस्थापकाचार्य कृष्णकृपामुर्ती श्रील ए.सी.भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या आर्शीवादाने, इस्कॉन जुहू मुंबई येथील श्रीमान निमाई निताई व श्रीमान विष्णु तत्व प्रभुजी यांच्या मार्गदर्शनाने बुलडाण्यात हॉटेल कृष्णा, छत्रपती टॉवर याठिकाणी बुलडाणा नगरीतील श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव २०२२ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे... हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामत्रांचे संकिर्तन करण्यात आले. त्यानंतर श्री भगवान कृष्ण यांची जन्म कथा श्रीमान आनंद चिन्मय प्रभुजी चिखली यांनी कथन केली.यानंतर भगवान श्रीकृष्णांना जलाभिषेक,दुग्धाभिषेक, दहीभिषेक, तुपभिषेक, मध व विविध फळांच्या रसाचा व फुलांचा अभिषेक सर्व भक्तांकडून करण्यात आला. तसेच सर्व माताजींनी प्रेमाने व श्रद्धेने श्री भगवंतांना ५६ भोग तयार करुन अर्पण करण्यात आले.हे दृष्य पाहुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. याप्रसंगी बालगोपाळांनी कृष्ण, राधा यांच्या हुबेहुब वेशभुषा साकारून कार्यक्रमात प्रत्यक्ष जणु श्रीकृष्ण अवतरले असा भास होत होता.यामधे सृष्टी एंडोले,चैतन्य एंडोले, कार्तिक रिंढे, सृष्टी देशमुख,परी लाऊडकर, अमेय टेकाडे या बालक बालिकांनी सहभाग घेतला.त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी, महामहोत्सवात बुलडाणा व चिखली शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दर शनिवारी सायंकाळी ५.३० ते ७.०० वाजता गीता लाईफ हा श्रीमद भगवद् गीतेवरील मार्गदर्शन, श्लोक वाचन व अध्ययन कार्यक्रमात भक्तगणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी सर्व भक्तगण व माताजींचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...